Friday, 30 January 2015

एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा १

                                                                गांधींच्या नावाला माझा  विरोध  नाही गांधींनी त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे खूप कार्य केलं. पण गांधींना  जो मान सन्मान मिळतोय तो सर्वच  क्रांतीकारकांना मिळावा इतकीच  माफक अपेक्षा आहे. पण जर असे व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपणही त्यावर मेहेनत घेण गरजेचं आहे. गांधी आज सर्वज्ञात आहे त्याचं कारण म्हणजे गांधींच्या कार्याचा  प्रचार प्रसार तितक्याच जोमाने झाला. त्या  तुलनेत बाकीचे क्रांतिकारक पडद्या आड झाले. गांधींच्या नावा प्रमाणे इतर क्रांतिकारकांचा सन्मान जर हवा असेल तर त्यांच्या कार्याचा आलेख  सर्व जन माणसापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे.
                                                               त्यांची शौर्यं गाथा सर्वांच्या मनावर बिंबवली पहिजे.त्यासाठी आधी आपण  सर्वांना ते कोण होते ? त्याचं ध्येय होतं ? त्यांनी केलेली देशसेवा आपण समजून घेतली पाहिजे. समाज बदलायचा असेल तर  आधी आपल्यापासून करायला हवी. भारत मातेसाठी लढताना धारातीर्थी पडलेल्या त्या तमाम वीरांना माझा सलाम . त्यांच्या कार्याला माझा सलाम. त्यांच्या  देशभक्ती ला माझा सलाम . त्यांच्या मातृभक्ती ला माझा सलाम. जय हिंद , वन्दे मातरम .......

Wednesday, 28 January 2015

एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा

                                             

                                                एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा

                                           एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा निमित्त होत प्रजासत्ताक दिनाच. सकाळची शाळकरी मुलांची प्रभातफेरी आणि त्या प्रभातफेरी मधली हि घोषणा . आम्ही शाळेत असताना हि ह्याच घोषणा दिल्या कि. हो पण त्यावेळी कळत  नव्हत  त्यांचा  अर्थ काय असतो. आज जेव्हा थोडीफार पुस्तक वाचली मोठ्यांच्या भाषेत अक्कल आली तेव्हा ती घोषणा विचार करायला  लावणारी वाटली.
                                            एक रुपया चांदीचा ठीके  पण सारा देश गांधीचा हे मात्र मनाला अज्जिबात पटलेल नाही. मग ह्या भारत मातेच्या स्वातंत्र्य साठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच काय ????? हा देश त्यांचा सुद्धा का असू शकत नाही ?? लोकमान्य टिळक, अगरकर,रानडे,भावे, स्वातंत्रवीर सावरकर , चंद्र शेखर आझाद , भगत सिंग ,राजगुरू ,सुखदेव , बाबू  गेनू ,चाफेकर बंधू , स्वामी विवेकानंद , वासुदेव बळवंत फडके , अनंत कान्हेरे , झासी ची राणी लक्ष्मी बाई, सुभाषचंद्र बोस अशी असंख्य नाव ह्या मातेच्या  सेवेसाठी धारातीर्थी  पडली , झटली , लढली , तुरुंगवास ,नरकयातना , अनन्वित अत्त्याचार सार सहन केल. कारण त्यांची आस त्यांचा ध्यास आणि त्यांचा श्वास एकच होता आणि तो म्हणजे आमच्या भारत मातेला ह्या गुलामगिरीच्या बेड्यांतून मुक्त करायचं .ह्या मातीला स्वातंत्र्य करायचं आणि आपल हक्काचं राष्ट्र पुन्हा एकदा स्थापन करायच. आणि ते म्हणजे अखंड हिंदुस्थान.
                  का  ओ ह्या चांदीच्या रुपयावर त्यांचा काहीच हक्क नाही का ? कित्त्येकांनी भारत मातेच्या मुक्ती साठी आपल्या सुखी जीवनावर  तिलांजली वाहिली . ऐन तारुण्यात आपल्या जीवनाचा शेवट केला. काहींनी तर आपला सर्वच पणाला लावल. तरीदेखील राष्ट्रपिता गांधी का ?  चलनावर गांधीच का ? प्रत्येक वेळी  गांधीच ग्रेट का ?

                  हो मी अडाणी आहे, लहान आहे, अक्कल शुन्य आहे तरी मला कोणी हे  समजून  सांगेल का ?????